मुंबईला जातो म्हणून गेलेला २३ वर्षीय युवक बेपत्ता

सोलापूर – मुंबईला जातो असे सांगून घरातून पडलेला सोलापूरमधील एक २३ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.शिवकुमार कृष्णा ठोंबरे (वय २३ वर्षे, रा. ५०५, पंचशील नगर, कुमठा नाका, सोलापूर) असे बेपत्ता झालेल्या युवकाचे नाव आहे.

नेमकी घटना काय?-

​मिळालेल्या माहितीनुसार, ४ जुलै २०२६ रोजी दुपारी ०१:०० वाजण्याच्या सुमारास शिवकुमार याने ‘मी कल्याण (मुंबई) येथे जातो’ असे घरच्यांना सांगितले. त्यानंतर दुपारी ०२:०० वाजता त्याने मुंबईसाठी ट्रेन पकडली. मात्र, त्याच दिवशी रात्री १०:०० वाजता त्याच्या वडिलांनी त्याला फोन केला असता, त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता.

​त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचे नातेवाईक, मित्र आणि इतर सर्व संभाव्य ठिकाणी शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. शेवटी ७ जुलै २०२६ रोजी त्याच्या वडिलांनी सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे मुलगा बेपत्ता झाल्याची रीतसर तक्रार दाखल केली.

पोलीस प्रशासनाचे आवाहन-

​सदर बाजार पोलिसांनी या युवकाचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया आणि इतर माध्यमांचा वापर सुरू केला आहे. या वर्णनाचा युवक कुठे आढळल्यास किंवा या संदर्भात काही माहिती मिळाल्यास तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *